म्हाडामध्ये होणार ५३४ पदांची मेगाभरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । म्हाडामध्ये पुढील काही दिवसात ५३४ कर्मचारी पदभरती करण्यात येणार आहे. म्हाडामध्ये गृहनिर्माण प्रकल्प, लॉटरी पात्रता पडताळणी, पुनर्विकास योजना, संक्रमण शिबिरांशी संबंधित कामांसाठी कर्मचाऱ्यांची मोठी गरज लागते. वांद्रेतील मुख्यालयासह राज्यातील अन्य कार्यालयांमध्येही कामे आणि मनुष्यबळाची संख्या व्यस्त आहे.

त्यामुळे म्हाडामध्ये जवळपास पाचशेहून अधिक कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. हे लक्षात घेऊन यासंदर्भातील निर्णय बुधवारी म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबरच गेली काही वर्षे म्हाडामध्ये कंत्राटी पद्धतीने काम कारणाऱ्या कामगार आणि कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. म्हाडामधील कर्मचाऱ्यांची भरती ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये होणार होती. मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया रखडली.

मात्र, आता सरकारही स्थापन झाले असल्याने ही मेगाभरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवण्यात यावी असा निर्णय बुधवारी झालेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. म्हाडाच्या मुंबई, कोकण विभागाने काढलेल्या लॉटरी धारकांना अजून ताबा मिळालेला नाही. गिरणी कामगारांच्या घरांचीही रखडपट्टी झाली आहे. म्हाडाने पंतप्रधान आवास योजना, पुनर्वसन योजनांवरील कार्यवाहीही करणे अपेक्षित आहे.

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]