एसटी महामंडळात होणार मेगा भरती ; 24 हजार जागा रिक्त

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । एसटी महामंडळात मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. गेल्या  दोन वर्षात महामंडळात रिक्त जागा भरण्यात आल्या नाहीत. त्यामुळे 15 हजार रिक्त जागा निर्माण झाल्या आहेत. त्यामध्ये चालक, वाहकांच्या रिक्त जागा मोठ्या प्रमाणात आहेत.  .

एसटी महामंडळासाठी वर्ग-1 ते वर्ग-4 साठी 1 लाख 26 हजार 115 जागा मंजुर आहेत. तर यात 1 लाख 4 हजार 398 मुष्यबळच सध्या कार्यरत आहे. हे पाहता एकूण 22 हजार 24 हजार जागा रिक्त असून यामध्ये 6 हजार 902 ही बढतीतील पदे तर 15 हजार 122 सरळ सेवेतील परिक्षा घेऊन भरण्यात येणार्‍या पदांचा समावेश आहे.

सध्या 36 हजार 732 चालक असून आणखी 2 हजार 977 चालकांची गरज आहे. तर 34 हजार 807 वाहक कार्यरत असून आणखी 3 हजार 963 वाहकांची कमतरता महामंडळाला भासत आहे. कारागिर, सहाय्यक कारागिर यांचीही 5 हजारपेक्षा जास्त पदे तर हेल्परसह वर्ग-4 मधील अन्य काही पदेही रिक्त आहेत.

या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता – 

  चालक – दहावी उत्तीर्ण, आरटीओ एचएमव्ही परवाना व पी.एस.व्ही. बिल्ला + १ वर्षाचा अनुभव

     वाहक – दहावी उत्तीर्ण + आरटीओ कंडक्टर परवाना व बिल्ला

वयाची अट – खुला गट – 24 ते 38 वर्षे, राखीव जागा -24 ते 43 वर्षे, भूकंप / प्रकल्प – बाधित उमेदवार- 24 ते 45 वर्षे

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”