करिअरनामा ऑनलाईन – मिरा-भाईंदर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 473 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.मुलाखत देण्याची तारीख 8 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mbmc.gov.in/
एकूण जागा – 473
पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.वैद्यकीय अधिकारी – 10 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBMS पदवी आवश्यक व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी आवश्यक.
2.वैद्यकीय अधिकारी (आयुष)/ Medical Officer (Ayush) – 60 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए.एम.एस, बी.एच.एम.एस., बी. यू. एम. एस. व तत्सम अर्हता पदवी आवश्यक व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी आवश्यक.
3.प्रसविका – 400 जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी/बारावी परीक्षा उत्तीर्ण आणि मान्याताप्राप्त संस्थेतील ऑक्झीलेरी मिडवाईफ नर्सिंग कोर्स पूर्ण, महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी आवश्यक.
4.बायोमेडिकल अभियंता – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – बायोमेडिकल अभियांत्रीकी क्षेत्रातील पदवी व संबंधित क्षेत्रात काम केल्याचा किमान एक वर्षाचा अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा – 38 वर्षांपर्यंत (38 Years)
शुल्क – शुल्क नाही
वेतन –
1.वैद्यकीय अधिकारी – 80,000/-
2.वैद्यकीय अधिकारी (आयुष) – 60000-/
3.प्रसविका – 25000-/
4.बायोमेडिकल अभियंता – 40,000/-
नोकरीचे ठिकाण – मिरा-भाईंदर, ठाणे (महाराष्ट्र).MBMC Recruitment 2021
मुलाखत देण्याची तारीख – 8 मे 2021
मुलाखत देण्याचे ठिकाण – ठिकाण – वैद्यकीय आरोग्य विभाग, पहिला मजला, मीरा-भाईंदर, (स्व. इंदिरा गांधी भवन), मुख्य कार्यालय, भाईंदर (प.).
अटी व शर्ती –
1.उमेदवाराची निवड ही कोव्हिड 19 साथ कालावधीपुरतीच राहणार असून सदर साथ कमी झाल्यास किंवा रुग्णालयातील कोव्हिड 19 उपचार कक्ष बंद झाल्यास किंवा रुग्णसंख्या कमी झाल्यास सदरील नेमणूक तात्काळ संपुष्टात आणण्यात येईल. त्यासाठी 1 महिन्याची नोटीस दिली जाणार नाही, याची स्पष्ट नोंद घ्यावी.
2.नियुक्तीच्या कालावधीत नियुक्तीच्या ठिकाणी सोपविलेले काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. 3.सदर नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपात ठोक मानधनावर देण्यात येणाऱ्या आल्यामुळे संबंधितास महानगरपालिकेच्या / शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाबाबत / सामावून घेण्याबाबतचा अधिकार व हक्क नसेल.
4.इच्छुक व पात्र उमेदवारांनी जाहिरातीमधील नमूद केलेल्या शैक्षणिक पात्रता / अर्हता (इयत्ता दहावी व त्यापुढील) तसेच अनुभव प्रमाणपत्र यांच्या अर्जासोबत छायांकित प्रती सादर कराव्यात.
निवड करण्याची पद्धत –
प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव भरती प्रक्रिया कोणत्याही वेळेस कोणत्याही टप्प्यावर थांबविण्याचे अधिकार आयुक्त, मिरा भाईंदर महानगरपालिका यांना राहतील.
अधिकृत वेबसाईट – www.mbmc.gov.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com