करिअरनामा। राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्यात येणार आहे आणि यासंबंधीचे विधेयक येणाऱ्या अधिवेशनात मांडणार असल्याची माहिती मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.
राज्यातील 1 ली ते 10 वी पर्यंतच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषा विषय अनिवार्य करण्यात येणार आहे. या संबंधीची बैठक 21 जानेवारी रोजी मंत्रालयात पार पडली. या बैठकीत सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बैठकीला मराठी भाषा विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे तसेच विधी व न्याय विभागाचे सचिव राजेंद्र भागवत उपस्थित होते.
मराठी भाषा संवर्धनासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील असल्याचे दिसते. शासकीय कामकाज मराठी भाषेत करण्याचा निर्णयही देसाई यांनी घेतला आहे.
अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आमच्या www.careernama.com या वेबसाईटला लाईक करा. तसेच नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.