करिअरनामा । लातूरमध्ये महावितरण विभागात जवळपास 134 पदांसाठी भरतीप्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती लातूर परिमंडळ विभागातील मानव संसाधन विभागाचे सहायक महाव्यवस्थापक नामदेव पवार यांनी दिली.
अनेक वर्षांपासून लातूर परिमंडळ विभागातील उस्मानाबाद, लातूर, बीड या तीन जिल्ह्यांतील महावितरणच्या अनेक कार्यालयांत अभियंते नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. सध्या या कार्यालयाचा कारभार प्रभारी अभियंते व तंत्रज्ञानावरच सुरू आहे. यामुळे उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यांतील वीज ग्राहकांची गैरसोय होत आहे.
तांत्रिक बिघाड, रोहित्रे दुरुस्ती, वीज देयक दुरुस्ती, नवीन वीजजोडणी आदी कामे वेळेत होत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. रिक्त पदे भरण्यासाठी महावितरणच्या मानव संसाधन विभागाकडून (एचआर विभाग) ऑक्टोबर 2019 मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल 17 जानेवारीला लागला असून, मुंबई येथील प्रकाशगडच्या मानव संसाधन विभागाकडून नवीन पात्र अभियंत्याची पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत आणि थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.