करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. विविध पदांसाठी असलेली शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेगवारांना 21 जानेवारी 2021 अंतिम तारीख असेल.अधिक माहितीसाठी http://mahametro.org ही वेबसाईट बघावी.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – तंत्रज्ञ, अभियंता इ.
पात्रता – 10 वी उत्तीर्णांपासून पदवीधारक अर्ज करू शकतात.
तंत्रज्ञ – 10 वी उत्तीर्ण असावे.
NCVT/SCVT मान्यता प्राप्त संस्थांचं आयटीआय प्रमाणपत्र असायला हवं.
स्टेशन नियंत्रक आणि कनिष्ठ अभियंता – मान्यता प्राप्त संस्थेमधून अभियांत्रिकीच्या संबंधित विषयात तीन वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.
सेक्शन अभियंता – उमेदवारानं मान्यता प्राप्त संस्थेतून संबंधित विषयात बीई किंवा बीटेकचं शिक्षण घेतलेलं असावं.
वयाची अट – किमान वय 18 वर्षे, तर कमाल वय 28 वर्षे असावं.
शुल्क – जनरल आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांना 400 रुपये शुल्क भरावं लागेल. तर अन्य उमेदवारांना 150 रुपये भरावं लागेल.
निवड प्रक्रिया – सर्व पदांसाठी निवड करताना आधी लेखी परीक्षा होईल. त्यानंतर मुलाखत घेतली जाईल.
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जानेवारी 2021
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – http://mahametro.org
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com