या तारखेपासून सुरु होणार १० वी ,१२ वी च्या परीक्षा ; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे संकेत

First to fourth school only two months! Anganwadi is closed this year
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील शाळा अद्यापही बंदच आहेत. अशा परिस्थितीत दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा कधी होणार याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वपूर्ण संकेत दिले आहेत.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेल्या शाळा अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. शाळा बंद असल्या तरी या काळात शिक्षण विभागाकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. तसेच ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. मात्र, बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा कधी होणार? असा प्रश्न सर्व विद्यार्थी आणि पालकांना पडलेला आहे. यावर आता राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, “ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नवीन विषाणू आहे, नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस परिस्थिती पाहू आणि त्यानंतर पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात विचार करु. सीबीएसईने जसं परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. तशाच प्रकारे आम्ही सुद्धा १५ एप्रिलनंतर १२वी बोर्डाची परीक्षा घेण्याचा आणि १ मे नंतर दहावी बोर्डाची परीक्षा घेण्याच्या संदर्भात विचार करत आहोत”.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com