मुंबई | विद्यापीठ परिक्षा घेण्यासाठी केंद्रीय गृहखात्याने परवानगी दिल्यानंतर युजीसीने विद्यापिठ परिक्षा घेण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारला गाइडलाईन पाठवल्या होत्या. आता ठाकरे सरकार यावर काय भुमिला घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपली भुमिका मांडली आहे. विद्यापीठ परिक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम असल्याचं सामंत यांनी स्पष्ट केले आहे. कुठलंही राजकारण न करता विद्यार्थी हिताचा निर्णय आपण घेणार आहोत असं सांमत यांनी सांगितले आहे.
विद्यापीठ परिक्षा घ्यायच्या की नाही यावरुन आता राज्यातील राजकारण तापले आहे. कोरोन काळात राज्य सरकार परिक्षा घेऊ शकत नाही असे म्हणत ठाकरे सरकारणे आपला निरचणय जाहीर केला आहे. UGC ने विद्यापीठ परिक्षा घेण्यासंदर्भात जी गाईडलाईन दिली आहे त्याआधारे महाराष्ट्र सरकार परिक्षा घेऊ शकत नाही. राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. ही जाणीव ugc ला करुन दिली आहे. आणि तरी युजीसी ला परिक्षा घ्यायच्याच असतील तर त्या कशा घ्याव्यात हे युजीसीने स्पष्ट करावं असं मत उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, कुलगुरु, पालक, विद्यार्थी यांचे परिक्षा न घेण्यावर ऐकमत असताना शासनाल न विचारता हा निर्णय घेणे हे विद्यार्थ्याच्या जीवाशी खेळ आहे. आणि जर परिक्षा घ्यायच्या असतील तर कंटेनमंट झोनमधील विद्यार्थ्यांना परिक्षांना कसे आणायचे? विद्यार्थ्यांच्या परिक्षा किती बँच मध्ये घेतल्या पाहिजेत याची गाईडलाईन युजीसीने दिली पाहिजे. एका वर्गात किती विद्यार्थी बसवायचे? पेपर प्रिंटींग कुठे करायचे? रोबोट मार्फत करायचे की माणसामार्फत करायचे? उत्तरपत्रिका कोण तपासणार? प्रश्नपत्रिका कोण हाताळणार? शिक्षक, प्राध्यापकांचे सोशल डिस्टंसिंग आपण कसे पाळणार आहोत? या सर्वाबाबत युजीसी आणि केंद्रीय गृहमंत्रालयाच्या गाइडलाईन आम्हाला आल्या पाहिजेत. असेही सामंत यांनी म्हटले आहे.
नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com