करिअरनामा । विविध विभागांच्या नोकरभरतीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने महापोर्टलवर घेतल्या जातात. मात्र, राज्य शासनाच्या महापोर्टलबाबत अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे सरकारने महापोर्टल अखेर बंद केलं आहे. महापोर्टल बंद झाल्याने जवळपास ८५ टक्के विद्यार्थ्यांच्या आणि खासदार सुप्रिया सुळेंच्या मागणीला यश आले आहे. मात्र, यावर सरकारने अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
दरम्यान महाराष्ट्र सरकारकडून विविध विभागातील तब्बल ७२ हजार पदांच्या महाभरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे ही मेगाभरती प्रक्रिया महापोर्टलद्वारे पार पडणार नसल्याचं निश्चित झालं आहे. फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या महाभरतीला महाविकास आघाडीने मुर्त स्वरुप दिले आहे. गृह, पाणी पुरवठा, शिक्षण, सामाजिक न्याय, महसूल, आरोग्य, पशुवसंर्धन यासह अन्य विभागांकडून रिक्त पदांची माहिती संकलित करण्यात आली आहे.
राज्यातील विविध विभागांमध्ये सद्यस्थितीत पावणेदोन लाख रिक्त पदे आहेत. राज्याची आर्थिक स्थिती पाहता पहिल्या टप्प्यात 70 ते 72 हजार पदांची भरती केली जाणार असून त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी सुमारे आठ ते साडेआठ हजार कोटी द्यावे लागणार आहेत.
अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.