Mahanirmiti Recruitment 2024 | अनेक लोकांची सरकारी नोकरी करण्याची इच्छा असते. आणि ही नोकरी करण्यासाठी ते अनेक प्रयत्न देखील करत असतात. आता सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आम्ही आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कारण आता महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती (Mahanirmiti Recruitment 2024)कंपनीमध्ये काम करण्याची एक चांगली संधी आलेली आहे. कंपनीने विविध पदांसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध केलेली आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. या भरती अंतर्गत 800 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे 26 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
पदाचे नाव | Mahanirmiti Recruitment 2024
या भरती अंतर्गत तंत्रज्ञ 3 या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे.
एकूण रिक्त जागा
या भरती अंतर्गत 800 रिक्त जागा भरल्या जाणार आहे
शैक्षणिक पात्रता
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित विषयात आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
26 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
आवश्यक कागदपत्र
दहावीची गुणपत्रिका आणि इतर कागदपत्र
आयटीआयच्या चार सेमिस्टरचा निकाल
मागास प्रवर्गातून असल्यास जात प्रमाणपत्र आणि अधिवास प्रमाणपत्र.
वेतनश्रेणी | Mahanirmiti Recruitment 2024
या भरती अंतर्गत जर तुमची निवड झाली तर उमेदवाराला दर महिना 34,555 रुपये ते 86, 865 रुपये एवढ्या वेतन मिळेल