करिअरनामा ऑनलाईन ।(TET Result 2020) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल जाहीर केला आहे. 16 हजार 592 उमेदवार शिक्षक पदासाठी पात्र झाले आहेत. यंदा परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत यंदाचा निकाल कमी असला तरी गेल्या पाच वर्षातील हा सर्वाधिक निकाल आहे.
टीईटी परीक्षा 19 जानेवारी 2020 रोजी घेण्यात आली होती. इयत्ता पहिली ते पाचवी गटासाठी पेपर 1 तर सहावी ते आठवी गटासाठी पेपर 2 या पद्धतीने टीईटी परीक्षा घेण्यात आली होती. यापरीक्षेत 16 हजार 592 उमेदवार शिक्षक पदासाठी पात्र झाले आहेत.
राज्यातील 1,88,688 उमेदवारांनी पेपर 1 दिला होता त्यापैकी यापरीक्षेत 16 हजार 592 उमेदवार शिक्षक पदासाठी पात्र झाले आहेत.तसेच पेपर 2 देणाऱ्या 1,54.596 उमेदवारांपैकी 6105 उमेदवार पात्र ठरले आहेत. टीईटी निकालात आरक्षण, प्रवर्ग, वैकल्पिक विषय अपंगत्व आदींचा लाभ मिळाले नसल्यास येत्या 15 आॅगस्ट पर्यंत लॉगइन आयडीचा वापर करून तक्रार नोंदवावी, असे परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी कळवले.