करिअरनामा । जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने राज्याबाहेरील उमेदवारांना नोकरीची दारे अखेर खुली केली आहेत. न्यायालयाने ३३ रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून, याकरिता देशभरातील पात्र उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याच्या दर्जा बहाल करणारे कलम ३७० रद्द करून जम्मू-काश्मीर व लडाखला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच राज्याबाहेरील उमेदवारांना येथे नोकरीची संधी देण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे महानिबंधक संजय धार यांनी २६ डिसेंबरला ही जाहिरात प्रसिद्ध केली असून, यासाठी उमेदवारांना ३१ जानेवारी २०२० पर्यंत अर्ज सादर करावयाचे आहेत. उच्च न्यायालयातील पदांसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमधील उमेदवारांनी संबंधित मुख्य जिल्हा न्यायाधीशांकडे अर्ज सादर करावयाचे आहेत.
त्यानुसार काश्मीर प्रांत, भदेरवाह, किश्तवार आणि लडाख येथील मुख्य जिल्हा न्यायाधीशांना सर्व व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्यांनी हिवाळी सुट्टीतही अर्ज स्वीकारावेत, असे सांगण्यात आले आहे. या सर्व जिल्हा न्यायाधीशांनी उमेदवारांच्या यादीसह त्यांचे अर्ज ७ फेब्रुवारी २०२०पर्यंत उच्च न्यायालयाच्या महानिबंधकांकडे सुपूर्द करावयाचे आहेत.
_—-__
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.