करिअरनामा । भारतीय अर्थव्यवस्थेवर सध्या आर्थिक मंदीचे सावट असून देखील देशातील दिग्गज आयटी कंपनीने विद्यार्थ्यांना एक खुशखबर दिली आहे. त्यामुळे IT क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे नशीब उजळणार आहे. एचसीएल टेक्नॉलजी कॉलेज कॅम्पसच्या माध्यमातून नवीन विद्यार्थ्यांची भरती करणार आहे. या चालू वर्षांमध्ये कंपनीने कॉलेज कॅम्पस मधील 8,600 विद्यार्थ्यांना भरती केले होते.
आयआयएम-कोझिकोड, इंदूर आणि लखनऊच्या मॅनेजमेंट पदवीधरकांना कंपनी वार्षिक 15 ते 18 लाख इतके पॅकेज देते. IIM – अहमदाबाद, बँगलोर आणि कलकत्ता, ISB, XLRI तसेच SP Jain जैन येथील मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतलेल्यांना वर्षाला 20 ते 23 लाख रुपयांचे पॅकेज देतात. त्याचबरोबर, कंपनी इतर महाविद्यालयांच्या पदवीधरांना वर्षाकाठी साडेचार ते सात लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज देते.
एचसीएलकडून बारावी पास विद्यार्थ्यांची देखील भरती केली जाते. त्यांना एक वर्षांचे प्रशिक्षण देखील दिले जाते. यामध्ये नऊ महिन्यांचे शिक्षण आणि तीन महिन्यांसाठी नोकरी दिली जाते.
अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.