करिअरनामा ऑनलाईन : तुम्ही देखील फ्रेशर आहात आणि चांगल्या कंपनी मध्ये नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. भारतातील दुसर्या क्रमांकाची सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिस अंतर्गत भारत आणि परदेशातील महाविद्यालयांमधील 26,000 फ्रेशर्स विद्यार्थ्यांना नोकरीची संधी देणार आहे. इन्फोसिस कंपनीच्या वाढत्या कारभारामुळे आणि ग्राहकांना तात्काळ सेवा पुरवण्यासाठी डिझाईन स्टुडिओ / डेटा सेंटर उभारण्यात येणार आहेत, त्यासाठी त्या क्षेत्रातील विध्यार्थ्यांना संधी देण्यात येईल असे इन्फोसिसचे CEO बिस्मा मलिक यांनी सांगितले आहे.
याबाबत बोलताना इन्फोसिस कंपनीचे कार्यकारी अधिकारी प्रविणकुमार राव म्हणाले की, ‘यावर्षी ही नवीन विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी कंपनी गुंतवणूक करणार आहे. कोविडच्या अनिश्चित काळामुळे आणि खर्च कपात प्रक्रियेचा एक भाग म्हणून कर्मचाऱ्यांची पगारवाढ थांबवावी लागली आहे. शेयर बाजारातही ही इन्फोसिस उच्चाकांवर आहे’. असे त्यांनी म्हंटले आहे.
डिजिटलयझेशन प्रशिक्षण घेणार –
इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख म्हणाले की, 2021 मध्ये इन्फोसिस डिजिटल व्यवसायात 50% पेक्षा जास्त व्यवसायत नफा झाल्यावर कंपनीनेही आपल्या कर्मचार्यांसाठी डिजीटलायझेशन प्रशिक्षण घेणार आहे. क्लाऊड,डेटा सिक्युरिटी आणि सायबर सिक्युरिटी या विविध क्षेत्रात कंपनीने मागच्या काही वर्षांत चांगली कामगिरी केली आहे आणि ग्राहकांनकडुन सातत्याने चांगला प्रतिसाद येत आहे .
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com