भारतीय लष्करात मोठी भरती; 8 वी आणि 10 वी पास असणाऱ्यांनाही संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय लष्करात विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.आठवी ते दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांना नोकरीची संधी मिळणार आहे. उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करायची आहे. ऑनलाइन नोंदणी करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2021 आहे. Indian Army Bharti 2021

भारतीय लष्करात स्वयंपाकी, ड्रेसर, शिंपी, रंगारी, स्टुअर्ड, कारागिर, मदतनीस कर्मचारी, धोबी, हाउस कीपर, मेस कीपर आणि घोड्यांची देखभाल करणे या कौशल्याधारित कामांसाठी ट्रेड्समनची नियुक्ती केली जाते. ट्रेड्समन पदावर नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी ऑनलाइन नोंदणी 14 जानेवारी 2021 पर्यंत सुरू आहे. पात्र उमेदवारांनी परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड  इ-मेलद्वारे पाठवले जाणार आहे. यासाठी नोंदणी करताना स्वतःचा इ-मेल योग्य प्रकारे नोंदवण्याची खबरदारी घ्यावी. इ-मेलद्वारे कॅडेटना परीक्षेचा दिवस, वेळ, परीक्षा केंद्र तसेच अॅडमिट कार्ड या संदर्भातील माहिती दिली जाईल तसेच अॅडमिट कार्ड पाठवले जाईल. Indian Army Bharti 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव  – शिपाई / सैनिक (ट्रेड्समन)

 पात्रता – मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून आठवी आणि दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक

वयाची अट – 17 वर्ष 6 महिने ते 23 वर्ष Indian Army Bharti 2021

ऑनलाइन नोंदणी करण्याचा शेवटचा दिवस – 14 जानेवारी 2021

ऑनलाईन नोंदणी करा – Apply Here

अधिकृत वेबसाइट – https://joinindianarmy.nic.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com