करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सैन्य दलात टेक्निकल एन्ट्री स्कीम अंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. केवळ फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करू शकतील. प्रशिक्षण जानेवारी 2021 पासून सुरू होणार आहे.
टेक्निकल ट्रेनिंगसाठी निवड झालेल्या उमेदवारांना पाच वर्षांचे प्रशिक्षण दिले जाते. यापैकी 1 वर्ष बेसिक मिलिटरी ट्रेनिंग तर चार वर्षे टेक्निकल ट्रेनिंग दिले जाते. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या उमेदवारांना सैन्यदलात लेफ्टनंटपदी रुजू केले जाते.
पदांची संख्या – 90
वयाची अट – 2 जुलै 2001 ते 1 जुलै 2004 या कालावधीत जन्म झालेले पुरुष उमेदवार अर्ज करू शकतील.
पात्रता – बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिकस् विषयांचे मिळून सरासरी किमान 70 टक्के गुण अनिवार्य.
निवड प्रक्रिया
उमेदवारांना शॉर्टलिस्ट करण्यात येईल आणि शॉर्टलिस्टमधील उमेदवारांना मुलाखतीला बोलावण्यात येईल. मुलाखत प्रक्रिया ऑक्टोबर 2020 नंतर सुरू होईल.
ऑनलाईन अर्ज करा – click here
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 सप्टेंबर 2020
अधिकृत वेबसाईट – www.joinindianarmy.nic.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com