करिअरनामा । अवघ्या काही दिवसांवर बारावीची आणि दहावीची परीक्षा आल्या आहेत. यावेळी सर्व अभ्यास पूर्ण होऊन ही परीक्षा हॉलमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होते, हॉलतिकीट तसेच परीक्षा नंबर शोधताना विद्यार्थ्यांची दमछाक होते.
पेपर कसे असतील ,पेपर वेळेत पूर्ण होईल की नाही, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांसमोर असताना अशावेळी घाबरून न जाता पेपर सोडवताना नेमकं काय करायचं चला तर आपण पाहूयात .
१) परीक्षा हॉलमध्ये न गोंधळता पेपर हातात आल्यानंतर पहिल्यांदा परीक्षा क्रमांक व्यवस्थित लिहा.उत्तर पत्रिकेच्या पहिल्या पानावरील माहिती व्यवस्थित भरा.
२) पेपर सोडवताना प्रश्न क्रमांक तसेच त्याचे उपप्रश्न क्रमांक नीट लिहावेत.नाहीतर त्याचे गुण जाण्याचा धोका असतो .त्याची काळजी घ्या.
३) नवीन प्रश्न नवीन पानावर लिहावा, प्रश्नाला किती गुण आहेत ते बघून उत्तराच्या शब्दाची मर्यादा ठरवावी. उत्तरे लिहिताना सुटसुटीतपणा महत्त्वाचा आहे.
४ ) पेपर आल्यानंतर संपूर्ण पेपर वाचावा त्यातील सोपे प्रश्न जे आपल्याला व्यवस्थित येतात ते पहिले लिहावेत. त्यातून तुमची उत्तरे लिहिण्याची पद्धत कळेल त्यामुळे पेपर तपासतांना त्याचा परिणाम होईल .
५) अधिक गुणांसाठी असणारे प्रश्न मुद्यानुसार लिहावेत , मुद्धे लिहून नंतर स्पष्टीकरण लिहावेत .त्याची शब्दांची मर्यादा प्रथम ठरवावी . अक्षर सुवाच्च काढावेत.
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”