IIT GATE 2021 परीक्षा आजपासून ; परीक्षा केंद्रे सज्ज

IIT GATE 2021
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग (GATE) परीक्षेचे आयोजन  ४ फेब्रुवारी पासून करण्यात आले आहे. परीक्षा ५ फेब्रुवारीपासून सुरू होत असून, ही परीक्षा १४ फेब्रुवारीला संपणार आहे. IIT GATE 2021

अधिकृत शेड्यूलनुसार, गेट परीक्षा ५, ६, ७, १२, १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० आणि दुपारी ३ ते ६ अशी दोन सत्रात आयोजित करण्यात आले आहे. परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहेत. जे उमेदवार परीक्षेत सहभागी होणार आहेत, त्यांनी अधिकृत वेबसाइट gate.iitb.ac.in वर जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करायचे आहे. यंदाच्या वर्षी ९ लाखांहून अधिक उमेदवार परीक्षा देणार असल्याची शक्यता आहे.

IIT मुंबईने परीक्षेसंबंधी सूचना – 

परीक्षा सुरू होण्याआधी एक तास अगोदर उमेदवारांनी GATE परीक्षा केंद्रावर पोहोचणे अनिवार्य आहे.

प्रवेशद्वारावर उभे राहिल्यावर फरशीवरील खुणा, चिन्हांचे पालन करावे.

जर कोणा उमेदवाराचे तापमान ९९.४ डिग्री हून अधिक असले तर त्याला परीक्षा केंद्रातील विलगीकरण क्षेत्रात बसून परीक्षा द्यावी लागेल.

उमेदवारांना मास्क, हातमोजे आणि हँड सॅनिटायझर, पेन, अॅडमिट कार्ड, पारदर्शक पाण्याची बाटली आणि परीक्षेसंबंधीची अन्य ओळखपत्रे, प्रमाणपत्रे परीक्षा हॉलमध्ये घेऊन जाण्याची परवानगी असेल

परीक्षा संपल्यावर अत्यंत शिस्तबद्धपणे परीक्षा केंद्राच्या बाहेर पडावे.

परीक्षा केंद्रावर दिलेल्या ड्रॉपबॉक्स मध्ये अॅडमिट कार्ड, रफ पॅड वगैरे ठेवावे.

सोशल डिस्टेंसिंगचे पालन करावे.

GATE 2021 मध्ये दोन बदल झाले आहेत – दोन नवीन विषयांचा समावेश आणि GATE 2021 च्या पात्रता निकषांमध्ये सवलत.

GATE – पर्यावरण विज्ञान आणि इंजीनियरिंग (ES) आणि ह्युमॅनिटी आणि सामाजिक विज्ञान (XS) मध्ये दो नव्या विषयांसह, विषयांची एकूण संख्या २७ झाली आहे.

अधिकृत वेबसाईट – http://gate.iitb.ac.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा https://careernama.com