ICWAI Exam Dates 2020| डिसेंबरमध्ये होणार परीक्षा; पहा वेळापत्रक

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।इन्स्टिट्यूट ऑफ कास्ट अकॉउंटन्टस ऑफ इंडियातर्फे आयसीडब्लूए अभ्यासक्रमाच्या परीक्षा डिसेंबरमध्ये घेण्यात येणार आहेत. फाऊंडेशन,इंटरमिजिएट आणि फायनल परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होतील.

कोरोना संसर्गामुळे जूनमध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता डिसेंबर मध्ये जून २०२० आणि डिसेंबर २०२० या दोन्ही सत्रांच्या परीक्षा होणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर जाऊन ऑनलाईन परीक्षा आणि घरातूनच ऑनलाईन परीक्षा असे पर्याय देण्यात आले आहेत.

परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक पूर्वीच संस्थेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संस्थेच्या वेबसाईट पाहण्याचे आवाहन संस्थेच्या पश्चिम विभागीय समितीचे अध्यक्ष हर्षद देशपांडे यांनी केले आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com