ICAI CA Final Result। ‘सीए’चा निकाल जाहीर; असा पहा निकाल

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने  सीए अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला. नोव्हेंबर महिन्यात अंतिम परीक्षा घेण्यात आली होती. ICAI ने जाहीर केलेला निकाल जुना आणि नवा दोन्ही कोर्सेसचा आहे. ICAIच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवार आपला निकाल पाहू शकतात.ICAI CA Final Result

ICAI च्या icaiexam.icai.org, caresults.icai.org, icai.nic.in या अधिकृत संकेतस्थळांवर जाऊन उमेदवारांना सीए परीक्षांचा जाहीर झालेला निकाल पाहता येईल.

गतवर्षी नोव्हेंबर २०२० मध्ये सीए अभ्यासक्रमाची अंतिम परीक्षा घेण्यात आली होती. एकूण ४ लाख ७१ हजार ६१९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यात सीए फाउंडेशन, इंटरमिडिएट आणि फायनलच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. एकूण १ हजार ०८५ केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती. कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षेला तीव्र विरोध करण्यात आला होता. अखेर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. ज्या उमेदवारांना कोरोनामुळे परीक्षा देता आली नाही, त्यांना जानेवारीत महिन्यात आणखी एक संधी देण्यात आली होती.ICAI CA Final Result

असा निकाल पहा – 

सर्वात आधी अधिकृत वेबसाईट icai.nic.in वर जा.

‘CA final result link’ लिंक वर क्लिक करा.

यानंतर विचारलेली माहिती समाविष्ट करा.

माहिती भरल्यानंतर निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

निकाल डाउनलोड करा आणि प्रत घ्या.

अधिकृत वेबसाईट – http://icai.nic.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा https://careernama.com