१० वी, १२ वी च्या परीक्षा घेण्याबाबत गृहखात्याकडून राज्य सरकारांना परवानगी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

नवी दिल्ली । देशात कोरोना रुग्णांची संख्या लाख पार करून गेली आहे. सर्वत्र विषाणूचा संसर्ग पाहता संचारबंदीचे नियम कडक करण्यात आले होते. शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली होती. आणि विषाणू संक्रमणाच्या धर्तीवर सीबीएसई/ आयसीएसई तसेच राज्य सरकारच्या बोर्डाच्या, १० वी, १२ वीच्या परीक्षा निलंबित करण्यात आल्या होत्या. सीबीएसई आणि राज्य सरकारच्या बोर्डाकडून गृह मंत्रालयाला या परीक्षा घेण्याच्या परवानगीची विनंती करण्यात आली होती. या विनंतीनुसार तपासणी करून गृह मंत्रालयाने संचारबंदीच्या नियमांमध्ये सूट देत या परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे.

देशातील विविध राज्यांमधील या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा विचार करून परीक्षा घेण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने केला आहे. संचारबंदीमध्ये सूट देऊन परीक्षा घेण्यात येणार असल्या तरी सामाजिक अलगाव चे नियम पाळूनच परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यासाठीचे काही नियम ही ठरविण्यात आले आहेत तसे पत्र गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना आज दिले आहे.

कंटेन्मेंट झोन मध्ये परीक्षा केंद्रांना परवानगी दिली जाणार नाही.  विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी वर्गाने फेस मास्क लावणे बंधनकारक असेल. सर्व केंद्रावर शारीरिक तापमान तपासण्याची सोय असेल, सॅनिटायझरची सुविधा आणि सामाजिक अलगाव पाळला जाईल. वेगवेगळ्या बोर्ड कडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक स्थिर असणे आवश्यक आहे. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांकडून (UT)विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येण्यासाठी विशेष बस ची सुविधा केली येईल. अशा नियमावली सह परीक्षा होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com