करिअरनामा ऑनलाईन । एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या (HCL Technologies) वतीने येत्या 12 आणि 13 फेब्रुवारीला व्हर्च्युअल रिक्रुटमेंट ड्राइव्हचं (virtual recruitment drive) आयोजन करण्यात आलं आहे. माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांपासून आयटी प्रोफेशनल्सपर्यंत सर्वांना संधी देत कंपनी 1000 उमेदवारांना नोकरी देणार आहे. नोकरभरतीबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी कंपनीची वेबसाईट hcltech.com ही वेबसाईट बघावी. HCL Recruitment 2021
पदवीचं शिक्षण पूर्ण केलेले फ्रेशर, 2 ते आठ वर्षांचा अनुभव असलेले तसंच Java, चीप डिझायनिंग, डॉटनेट, अझूर, सॅप, पायथॉन आणि इतर कौशल्यांमध्ये प्रवीण असलेले अनुभवी उमेदवारही या ड्राइव्हमध्ये सहभागी होऊ शकतात,तसेच गन्नावरम सेंटरमध्ये आणखी 5000 जणांची भरती होणार आहे. सध्या याठिकाणी 1500 कर्मचारी आहेत. अशी माहिती कंपनीच्या कॉर्पोरेट उपाध्यक्षा आणि न्यू व्हिस्टास प्रकल्पाच्या संचालिका श्रीमती शिवशंकर यांनी दिली. HCL recruitment 2021
उपक्रमाअंतर्गत माध्यमिक परीक्षांमध्ये 65 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला उमेदवार एका वर्षाच्या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतो. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर एंट्री लेव्हलचा जॉब त्याला कंपनीकडून मिळू शकतो. या प्रशिक्षणादरम्यान आपलं कौशल्य दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याची संधीही कंपनी देते. बिट्स पिलानी किंवा सास्रा विद्यापीठातून (BITS Pilani or SASTRA University) हे उमेदवार पुढचं शिक्षण घेऊ शकतात. शिवशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत सुमारे 750 विद्यार्थ्यांनी TechBee उपक्रमासाठी नावनोंदणी केली आहे.
अधिकृत वेबसाईट – http://hcltech.com
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com