करिअरनामा ।महापरीक्षा पोर्टल बंद केल्यानंतर आता महाआयटीच्या नियंत्रणात खासगी एजन्सीद्वारे मेगाभरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. पारदर्शक भरतीसाठी आयटी कंपन्यांमधील पदांची भरती करणाऱ्या सक्षम अशा संस्थेची नियुक्ती केली जाईल, असे महाआयटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
शासनाच्या आठ विभागांसाठी महापरीक्षा पोर्टलकडे नोंदणी केलेल्या 34 लाख 83 हजार विद्यार्थ्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाला सुपूर्द केला जाणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मेगाभरतीत आता आरोग्य, शिक्षण, महसूल, गृह, कृषी, पशुसंवर्धन विभागांमधील पदांची वाढ झाली आहे.
वर्ग- एक व वर्ग- दोनच्या अधिकाऱ्यांची भरती एमपीएससीमार्फत तर वर्ग- तीन व चारच्या पदांची भरती खासगी एजन्सीद्वारे भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अडीच महिन्यांत मेगाभरतीला सुरवात होणार असून दिवाळीपूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे नियोजन आहे.
ठळक बाबी…
> महाआयटीतर्फे खासगी एजन्सी नियुक्तीसह भरती प्रक्रियेचे झाले नियोजन.
> महापरीक्षा पोर्टलकडील विद्यार्थ्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाला देण्याची तयारी पूर्ण.
> भरती प्रक्रिया करणाऱ्या खासगी एजन्सीची क्षमता अन् तांत्रिक समितीसाठी तज्ज्ञांची समिती.
> एकूण रिक्त पदांच्या 50 टक्के जागा भरण्याचा वित्त विभागाचा निर्णय.
> मेगाभरतीनंतर राज्य सरकारला तिजोरीतून द्यावे लागणार दरवर्षी दहा हजार कोटी
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”