करिअरनामा। कृषी आणि प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने आसामच्या ‘तेजपूर लिची’ला जीआय टॅग जाहीर केले आहे. 2015 पासून जीआय टॅगच्या यादीमध्ये लिचीचे नाव होते. मात्र आता आसामच्या तेजपूर लिचीला हे भौगोलिक संकेत (जीआय) टॅग देण्यात आले आहे.
नॉर्थ ईस्टर्न रीजनल एग्रीकल्चरल मार्केटिंग कॉर्पोरेशन लिमिटेड (नेरमॅक) द्वारा 28 ऑगस्ट 2013 रोजी जीआय टॅगसाठी अर्ज करण्यात आला होता. आसामच्या तेजपूर लिचीला भौगोलिक संकेत (जीआय) टॅग मिळाले आहे, ज्यामुळे या वस्तूचा त्यांच्या राज्यात मूळ उत्पत्ती होण्याचा एक विश्वसनीय पुरावा बनला आहे आणि महत्वाचे म्हणजे इतरत्र तयार होणाऱ्या उत्पादनापासून ह्या लिचीचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे. तेजपुरातील लीची उत्कृष्ट गुणवत्ता, आनंददायी चव, आकर्षक लाल रंगाच्या रसाळ लगद्यासाठी प्रसिद्ध आहे.
भौगोलिक संकेत (GI) बद्दल:
विशिष्ट भौगोलिक उत्पत्तीच्या उत्पादनावर भौगोलिक संकेत (GI टॅग) वापरला जातो, जो त्याचे मूळ स्थान असल्यामुळे त्याचे विशिष्टता किंवा प्रतिष्ठा प्राप्त करतो. यासाठी पेटंट, डिझाइन आणि ट्रेडमार्क नियंत्रक जनरलच्या कार्यालयात अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कृषी व प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने कृषी उत्पादनांच्या निर्यातीसाठी जबाबदार आहे.
महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध GI टॅग–
सोलापुरी चादर, पुणेरी पगडी, पैठणी साडी, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, नाशिकची द्राक्षे, कोल्हापुरी गुळ, आजरा घनसाळ तांदूळ, वायगाव हळद, मंगळवेढा ज्वारी, भीवापूर मिरची, सिंधुदुर्ग व रत्नागिरी कोकम, वेर्गुला काजू, सांगली मनुका, लासलगाव कांदा, डहाणू घोळवड चिक्कू, बीडचे सिताफळ, जालन्याचे गोड संत्री, जळगावची केळी, मराठवाड्याचे केसर आंबे, पुरंदरचे अंजीर, जळवागचे वांग्याचे भरीत, सोलापूरचे डाळिंब, नागपूरची संत्री इत्यादी.
स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे :-
आसामचे मुख्यमंत्री: सर्वानंद सोनोवाल
राज्यपाल: जगदीश मुखी.
आसामचे लोक नृत्य: बिहू नृत्य, बागुरंबा, भोरताल नृत्य, झुमूर नृत्य.
#Tezpur #Litchi of #Assam have got the geographical indication (GI) tags, making this item an incontrovertible proof of their origins in the state, and protecting them from production elsewhere.#Aatmanirbharkrishi#Vocal4GI #agriculture @Brands_India pic.twitter.com/D0M1oUkbme
— APEDA (@APEDADOC) November 6, 2020
——————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page करीअरनामाला भेट द्या. करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ [email protected]
———————————————————-