पोलीस दलात पाच लाख जागा रिक्त ; कधी होणार भरती ?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । पोलीस दलात देशभरात पाच लाख जागा रिक्त आहेत.तसेच पोलीस दलात महिलांचे प्रमाण ९ टक्क्यापेक्षा कमी असल्याचे माहितीतून स्पष्ट झाले आहे.सध्या पोलीस खात्यात पाच लाख पदे रिक्त आहेत या पदांची भरती कधी होणार असा प्रश्न उमेद्वारांना पडला आहे.

अहवालाच्या माहितीनुसार पोलीस दलात २५ लाख ९५ हजार ४३५ जागा आहेत.त्यापैकी २० लाख ६७ हजार २७० जागांवर पोलीस कार्यरत आहेत.५ लाख २८ हजार १६५ जागा रिक्त आहेत.अशी माहिती पोलीस संशोधन आणि विकास केंद्राच्या अहवालात स्पष्ट झाल आहे.

पोलीस दलात महिलांचे  प्रमाण केवळ ८.९८ टक्के आहे.जानेवारी २०१९ मध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची क्षमता १० लाख ९८ हजार ७७९ होती.प्रत्यक्षात ९ लाख ९९ हजार ९१८ जागा भरलेल्या आहेत.सीएपीएफ मध्ये महिलांची संख्या २९ हजार ५३२ म्हणजे २.९५ टक्के आहे .

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”