करिअरनामा । आर्थिक संकटामुळे नोकरभरती न करण्याचा महापालिका प्रशासनाचा निर्णय स्थायी समितीने बदलल्याने नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
भरती प्रक्रिया कधी सुरू करायची याचा अधिकार प्रशासनाला असल्याने तात्काळ भरती प्रक्रिया सुरू होईल, असे नाही. मात्र भरतीच रद्द करण्याचे प्रशासनाचे निवेदन फेटाळल्याने भरतीची दारे उघडी राहिली आहेत,
मुंबई महापालिकेत ८१० लिपिकांची भरती करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी घेतला होता. अर्थसंकल्प मांडताना मात्र पालिकेची आर्थिक स्थिती सुदृढ नसल्याने भरती प्रक्रिया स्थगित करावी लागत आहे.त्यामुळे भरतीकडे डोळे लागलेल्या अनेक बेरोजगारांचा हिरमोड झाला होता. अखेर नोकरभरतीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून प्रशासनाने भरती प्रक्रिया लवकर राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
नोकरी अपडेट्स थेट तुमचा मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”