शेतीतही करिअर आहे! ‘या’ पठ्ठ्यानं डोकेलिटी वापरुन एका एकरात काढलं १० लाखांचं उत्पन्न

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

बीड । शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना नेहमीच कानावर येत असतात. मात्र शेतीचे योग्य नियोजन केल्यास, शेतात पीक लावण्यापासून ते उत्पादनापर्यंत शास्त्रशुद्ध आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती केल्यास नक्कीच चांगले परिणाम मिळू शकतात. बीडमधील एका शेतकरीपुत्राने अशाच पद्धतीने शेती करून चांगले उत्पन्न घेतले आहे. दुष्काळग्रस्त मराठवाड्यासारख्या भागात त्यांनी औषधी वनस्पतींची लागवड केली आहे. 

पारंपरिक शेतीला फाटा देत त्यांनी या शेतीचा पर्याय निवडला. पारंपरिक कापूस, सोयाबीन या नेहमीच्या पिकांऐवजी त्यांनी शतावरीचे पीक घेतले आहे. मेहनतीच्या जोरावर केवळ १८ महिन्यात त्यांनी १० लाखांचे उत्पन्न घेतले आहे. केज तालुक्यातील धनराज भुसारे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. शतावरीला बाजारात चांगली मागणी आहे. ही माहिती समजल्यावर त्यांनी एका खाजगी कंपनीशी करार करून शतावरीचे पीक घेतले आणि १८ महिन्यात १० लाखांचे उत्पन्न घेतले. 

पुण्यातील एका खासगी कंपनीने भुसारे यांना शतावरीचे पीक घेण्यासाठी प्रेरित केले होते. पूर्वी ते पारंपरिक शेती करत होते. मान्सून आणि पाणी शेतीवर खूप परिणाम करत असले तरी योग्य नियोजन केल्यास उत्तम पीक घेता येते हे त्यांनी दाखवून दिले आहे. शेतीत झालेल्या अनेकांसाठी एक आदर्श त्यांनी घालून दिला आहे.