10वी & 12वी बॉर्ड लेखी परीक्षेसाठी वाढवून मिळणार वेळ ; तसेच परीक्षा केंद्राची आणि उपकेंद्रांची संख्या वाढवली !

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – कोरोना विषाणूचा पादुर्भाव कमी झाल्याने दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा प्रचलित पद्धतीनेच होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा तिथे केंद्र & उपकेंद्र अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे.

इयत्ता बारावीसाठी परिक्षा केंद्राची & उपकेंद्रांची संख्या 2943 होती,ती वाढवून 9613 करण्यात आली आहे.तसेच दहावी साठी केंद्राची & उपकेंद्रांची संख्या 5042 होती,ती आता वाढवून 21349 करण्यात आली आहे.ज्या शाळेत 15 किंवा त्यापेक्षा जास्त संख्या असल्यास शाळा तेथे परीक्षा केंद्र & उपकेंद्र तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यार्थ्यांनच्या लिखाणाचा सराव कमी झाल्यामुळे लेखी पेपरसाठी जादा वेळ मिळणार आहे.70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटे तसेच 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटे वेळ वाढवून मिळणार आहे.

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com