इंजिनिअरिंग कॉलेज 01 डिसेंबर पासून होणार सुरू, AICTE ने जारी केले वेळापत्रक

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. वेळापत्रकानुसार प्रथम वर्षाचे अभ्यासक्रम एक डिसेंबरपासून सुरू होणार आहेत, तर ३० नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतील.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई)  शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी सदर सुधारित वेळापत्रक जारी केले आहे.

परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार इंजिनिअरिंग पदवी आणि पदविका प्रवेशांसाठीची मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत असणार आहे. त्यामुळे प्रथम वर्षांचे वर्ग १ डिसेंबरपासूनच सुरू होतील.