पुणे येथे होणार रोजगार मेळावा ; मेळाव्यात होणार 32 कंपन्या सहभागी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । पुणे येथे विविध खासगी कंपन्यांमधील रिक्‍त पदांसाठी निगडीमध्ये  मंगळवारी 18 फेब्रुवारीला पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात एकूण 32 कंपन्या सहभागी होणार असून, त्यामधील एकूण 3 हजार 737 रिक्‍त पदांकरिता पात्र उमेदवारांची भरती केली जाणार आहे.

मेळाव्यात सहभागी होण्याकरिता दहावी, बारावी, पदवीधर, पदव्युत्तर, कोणताही आयटीआय ट्रेड, बी.ई. मेकॅनिकल, बीबीए, एमबीए, बी.एस्सी., एम.एस्सी., बीसीए, बीसीएस, एमसीए, एमसीएस, एमसीएम अशा पात्रताधारक उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे भरती केली जाणार आहे.

मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी मूळ शैक्षणिक कागदपत्रे व त्यांच्या आवश्‍यक्‍तेनुसार झेरॉक्‍स प्रत, पासपोर्ट आकाराचे फोटो, बायोडाटा व आधारकार्डची झेरॉक्‍सप्रत सोबत आणावी.

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”