विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जावरून काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्ला

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

नवी दिल्ली |  मोदी सरकार व्यवसायिक किंवा तांत्रिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील विद्यार्थांना शिक्षा देत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी कर्ज घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना कर्जासाठी जी पात्रता आहे ती आर्थिकदृष्ट्या कमकुवत लाखों विद्यार्थ्यांच्या मार्गात अडसर ठरत असून भाजप सरकार त्यांना शिक्षाच देत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. शैक्षणिक कर्ज हे फक्त 1,056 संस्थापुरतेच मर्यादित करण्यात आले असून ते फक्त विद्यालक्ष्मी या पोर्टलच्या माध्यमातून मिळेल, असे काँग्रेस प्रवक्ता रणदीप सिंग सुरजेवाला यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

व्यावसायिक किंवा तांत्रिक शिक्षणासाठी कर्ज देण्यात येणारी या योजनेत अडचणी निर्माण करून भाजप सरकार युवकांच्या भविष्याशी खेळत असल्याचे ते म्हणाले. कर्जासाठी नवीन निकष ठरविल्याच्या माहितीअभावी फारच थोडे लोक या शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करत आहे. मागील चार वर्षाच्या काळात 1 लाख 44 हजार अर्जांपैकी फक्त 42,700 अर्जच कर्जासाठी पात्र ठरविण्यात आल्याचे ते म्हणाले.

केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्रालयाने अलीकडे लागू केलेली दिशादर्शक रिपोर्ट दाखवताना सुरजेवाला म्हणाले, जे विद्यार्थी केंद्राकडून निधीप्राप्त तांत्रिक संस्थातून तसेच राष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या संस्थांतून व्यावसायिक आणि तांत्रिक अभ्यासक्रमासाठी नोंदीत आहेत तेच या भारतीय बँक असोसिएशनच्या शैक्षणिक कर्ज योजनेसाठी पात्र असतील.

इतर महत्वाच्या बातम्या –

इंडियन नेव्हीमध्ये भरती

खुशखबर – युपीएससीच्या ‘या’ पदांसाठी होणार भरती

नैनिताल बँकेत १३० जागांसाठी भरती

आर्मी सर्व्हिस कॉर्प्स भर्ती 2019

इंजिनियर आहात ? तुमच्यासाठी सुवर्णसंधी