करिअरनामा ऑनलाईन ।अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या सुरु असलेल्या परीक्षांचे निकाल नोव्हेबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर होतील.या विद्यार्थ्यांना दूरशिक्षणाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेता यावा यासाठी प्रवेश प्रक्रियेला एक महिना मुदतवाढ देण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला असून, दूरशिक्षणाच्या अभ्यासक्रमाला आता ३० नोंव्हेबरपर्यंत प्रवेश घेता येईल.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालांतर्गत दूरशिक्षण अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.विद्यापीठाच्या वेळापत्रकानुसार प्रवेशासाठी ३० ऑक्टोबरची मुदत देण्यात आली होती,मात्र या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
दूरशिक्षण अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत ९ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.अंतिम वर्ष परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळण्यासाठी ३० नोंव्हेबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेचे संचालक डॉ.संजीव सोनावणे यांनी सांगितले.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा –https://careernama.com