कोरोनाची धास्ती । कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यासह संपूर्ण देशात असुरक्षितेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्व शाळा, मंदिरे, लायब्ररी, जिम बंद ठेवले आहेत, त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने राज्य गृह विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची भरती पुढे ढकलण्यात आली असल्याचं राज्य सुरक्षा महामंडळाच्या पोलीस अधीक्षक प्रज्ञा जेडगे यांनी सांगितल आहे.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या भरतीमधून 7 हजार पदे भरण्यात येणार असून त्यासाठी एक लाख 25 हजार तरुणांनी अर्ज केलेले आहेत. ही भरती 15 मार्चला होणार होती. मात्र कोरोना व्हायरसमूळे सुरक्षा म्हणून ही भरती पुढे ढकलण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ हा विभाग राज्य पोलीस दलातील एक महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाचे प्रमुख पोलीस महासंचालक असतात. मुंबईतील महत्वाच्या ठिकाणी या विभागाची सुरक्षा व्यवस्था पुरवली जाते. मुंबईतील मेट्रो रेल, मोनो रेल्वे, रेल्वे, त्याप्रमाणे राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक अति महत्वाच्या इमारतींना या विभागाची सुरक्षा पुरवली जाते.
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”