करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या लॉ अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२१ (CLAT 2021) परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे. देशातील २२ नॅशनल लॉ विद्यापीठांमधील एलएलबी (LLB) आणि एलएलएम (LLM) अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी क्लॅट परीक्षा आधी ९ मे २०२१ रोजी होणार होती. CLAT Exam Date 2021
सीएनएलयूची कार्यकारी समितीची बैठक झाली. यात परीक्षेची तारीख बदलण्यावर विचार झाला. सीबीएसई बोर्ड परीक्षा २०२१ (CBSE Board Exam 2021) मुळे क्लॅट २०२१ परीक्षेची तारीख बदलण्यात येत आहे. क्लॅट २०२१ चे आयोजन १३ जून २०२१ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत करण्यात आले आहे. CLAT Exam Date 2021
केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी ३१ डिसेंबर रोजी सीबीएसई बोर्ड परीक्षा २०२१ चे शेड्युल जारी केले होते. सीबीएसई दहावी, बारावीची बोर्ड परीक्षा ४ मे पासून सुरू होत आहे. ही परीक्षा १० जून पर्यंत चालणार आहे. अशात बोर्ड परीक्षेच्या तारखेशी क्लॅश होऊ नये म्हणून क्लॅट परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे.
अर्ज प्रक्रिया –
क्लॅट २०२१ साठी १ जानेवारी २०२१ पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार ३१ मार्च २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्जांची प्रक्रिया क्लॅटच्या consortiumofnlus.ac.in या संकेतस्थळाद्वारे पूर्ण करायची आहे. CLAT Exam Date 2021
अधिकृत वेबसाईट – consortiumofnlus.ac.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com