CBSE बोर्डाच्या परीक्षाबाबत बोर्डाने दिले स्पष्टीकरण

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोनाची जनतेमध्ये वाढलेली भीती लक्षात घेऊन सर्व शाळा, मंदिरे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा सुरूच आहेत. विद्यार्थी-पालकांकडून परीक्षा रद्द करण्याची मागणी होत असताना याबाबत सीबीएसई बोर्डाने ट्विटरवरून स्पष्टीकरण दिले आहे.

पालकांनी सीबीएसई परीक्षा रद्द करावी, अशी मागणी केली असता त्याबाबत सीबीएसई बोर्डाने परीक्षा स्थगित केलेली नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. ‘बोर्ड परीक्षा धोरणांच्या आधारे सक्षम अधिकाऱ्यांमार्फत घेतल्या जातात. हे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे’. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला नाही .

संसर्ग टाळण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोना विषाणू बाबत सर्वतोपरी खबरदारी घेतली जाईल. परंतु सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा नियमित होतील. असे सीबीएसई बोर्डाने स्पष्ट केले आहे.

नोकरी विषयक अधिक माहितीसाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”