WhatsApp Group
Join Now
करिअरनामा । बाल विकास प्रकल्प विभाग, दादरा नगर हवेली येथे अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज मुदतीच्या आत पाठवावेत.
पदांचा तपशील खालीलप्रमाणे –
पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
पद संख्या – ७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते २५ दरम्यान असावे.
अर्ज पद्धती – ऑफलाईन
निवड प्रक्रिया – मुलाखत
अर्ज करण्याचा पत्ता – बाल विकास परियोजना अधिकारी कार्यालय, तिसरा मजला, लेख भवन सिल्वासा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जानेवारी २०२०
अधिकृत वेबसाईट – http://dnh.nic.in/