कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराडच्या चारुदत्त साळुंखे याची भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर मध्ये संशोधक म्हणून निवड झाली. अखिल भारतीय स्तरावर झालेल्या GATE 2020 या परीक्षेतून सबंध देशातून ४८ वा क्रमांक मिळवत ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे नसल्याचे दाखवून दिले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील इतिहास घडवू शकतात याचंच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे चारुदत्त साळुंखे !
मूळचे चाफळ (ता.पाटण जि. सातारा) सारख्या ग्रामीण भागातील रहिवासी असणाऱ्या आणि प्राथमिक शिक्षण आदर्श प्राथमिक विद्यामंदिर कराड येथून पूर्ण करुन इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण शिवाजी हायस्कूल कराड येथून दहावीला ९४.५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण करणाऱ्या चारुदत्त साळुंखे यांनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या अटॉनॉमस कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केली. CoEP कॉलेजमधून शेवटच्या वर्षाला असताना एकाहून एक वरचढ प्रायव्हेट कंपन्यामधून नोकरीच्या संधी हातात असतानादेखील खाजगी क्षेत्रात जॉब न करता ज्या क्षेत्रातून आपण राहतो त्या समाजाला पर्यायाने आपल्या देशाला फायदा होईल अशा क्षेत्रात म्हणजेच शासकीय सेवांत अधिकारी होण्याचा निर्णय घेतला.
अखिल भारतीय स्तरावर झालेल्या GATE 2020 या परीक्षेतून सबंध देशातून ४८ वा क्रमांक मिळवत यशाच्या कमानीत नवा विक्रम प्रस्थापित केला. या यशाच्या जोरावरच सबंध देशाच्या टेक्नीकल क्षेत्राला दिशा देणार्या भाभा अनुसंशोधन केंद्राच्या संशोधक पदाच्या मुलाखतीसाठी निवड झाली. तंत्रज्ञान संशोधन म्हणजेच टेक्नीकल रिसर्च इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात भाभा अनुसंशोधन केंद्रातील मुलाखत सर्वात कठीण समजली जाते. सबंध देशातील या क्षेत्रातील तज्ञ मुलाखतकार सर्वोत्कृष्ट अशा संशोधकांची निवड करतात , तब्बल दीड तास चाललेल्या मुलाखती मधून चारुदत्त साळुंखे तावून सुलाखून संशोधक म्हणून निवड होऊन यशस्वी झालासबंधित स्पर्धापरीक्षा आणि यातील संधी याविषयी प्रत्येक गरजूला मार्गदर्शन करण्याची माझी तयारी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड बाळगू नये असं आव्हान चारुदत्त साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना केला आहे.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (http://@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com