करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या राज्यभरातील विविध ठिकाणच्या भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रांतील प्रवेशासाठी आता एकत्रित सामायिक प्रवेश परीक्षा होणार आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या राज्यभरातील विविध ठिकाणच्या भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रांतील प्रवेशासाठी आता एकत्रित सामायिक प्रवेश परीक्षा होणार आहे.
एमएचटी – सीईटीच्या धर्तीवर राज्य सरकारने एकत्रित सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असून राज्यातील सहा केंद्रांतील प्रवेशासाठीच्या परीक्षेसाठी आता एकच फार्म्युला असणार आहे. सामायिक परीक्षेत पूर्व परीक्षा, लेखी परीक्षा व मुलाखतीचा समावेश असला तरी त्या ऑनलाईन घेण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे युपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हव्या त्या केंद्रात प्रवेश घेता येणार आहे.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com