करिअरनामा ऑनलाईन ।केंद्रीय शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या असून लेखी परीक्षा ४ मेपासून तर प्रात्यक्षिक परीक्षा १ मार्चपासून होणार आहेत.
दरवर्षी साधारण फेब्रुवारी, मार्चमध्ये सीबीएसईची दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू होते. मात्र, यंदा जानेवारी उजाडेपर्यंत वेळापत्रक जाहीर न झाल्यामुळे विद्यार्थी अस्वस्थ होते. अखेर सीबीएसईच्या परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आली. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी परीक्षांच्या तारखा गुरुवारी जाहीर केल्या.
दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा ४ मे २०२१ पासून सुरू होणार असून १० जूनपर्यंत चालणार आहेत. त्यापूर्वी बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहेत. १ मार्चपासून प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होतील.परीक्षांनंतर निकालही लगेच जाहीर करण्यात येणार असून १५ जुलैपर्यंत निकाल जाहीर होईल. परीक्षांबाबतचा निर्णय विद्यार्थी, शिक्षक, पालक अशा सर्व घटकांनी दिलेल्या सूचना लक्षात घेऊन जाहीर करण्यात आल्याचे, रमेश पोखरियाल यांनी सांगितले.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com