नवी दिल्ली | कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा धोका जगभरातील अनेक देशात निर्माण झाला आहे. त्यामुळे भारतातही अशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यास केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. अशातच CBSE बोर्डाच्या परीक्षेबाबतही केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. CBSC Exam Date 2021
जानेवारी-फेब्रुवारीमध्ये CBSE बोर्डाची परीक्षा होणार नसल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. कोरोना काळात परीक्षा होणार की नाही, याबाबत सुरुवातीपासूनच संभ्रम होता. मात्र 3 डिसेंबर रोजी या परीक्षेबाबत बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी वेगळीच माहिती दिली होती.
आचार्य देवो भव: Interacting with teachers on upcoming board exams. #EducationMinisterGoesLive @EduMinOfIndia @SanjayDhotreMP @PIB_India @MIB_India @DDNewslive https://t.co/SSNzSkkV4f
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) December 22, 2020
‘2021च्या बोर्डाच्या परीक्षा ऑनलाइन नाही तर लेखी परीक्षा घेण्यात येतील. याबाबत अद्याप चर्चा सुरू असून बोर्डाच्या परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आली नाही. त्यासंदर्भात चर्चा सुरू असून लवकरच त्याही तारखा जाहीर केल्या जातील,’ असं केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) सांगण्यात आलं होतं. CBSC Exam Date 2021
क्लासेस ऑनलाईन मग परीक्षा का नको?
रमेश पोखरियाल निशंक यांनी काही विद्यार्थ्यांना अजून समान संधी मिळत नाही. सध्या आपण ऑनलाईन क्लासेस घेत आहोत. मात्र, सध्याच्या परीक्षेत ऑनलाईन परीक्षा घेणे अशक्य आहे, असं केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी सांगतिले. क्लासेस ऑनलाईन होत आहेत तर परीक्षा ऑनलाईन का व्हायला नकोत असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. Ramesh Pokhriyal said no CBSE board examination till February 2021)
30 टक्के अभ्यासक्रम कमी केला
सीबीएसई परीक्षांचा 30 टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे, अशी माहिती रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली. जेईई मेन 2021 परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांसमोर अधिक पर्याय उपलब्ध असतील, असं शिक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे. जेईई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना 90 प्रश्नांच्या दोन विभागातील फक्त 75 प्रश्न सोडवणे आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं.
केंद्र सरकारने लागू केलेले नवे शैक्षणिक धोरण लागू करताना शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे, असंही पोखरियाल म्हणाले. व्यावसायिक शिक्षण आणि आंतरवासियता 6 वीच्या वर्गापासून सुरु करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितले.