सावधान ! तरुणांनो नोकरी शोधताना होऊ शकते तुमची फसवणूक ; त्यामुळे या ५ टिप्स नक्की फॉलो करा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । सध्याच्या स्थितीला नोकरीचा खूप गंभीर प्रश्न आजच्या तरुणांसमोर उभा आहे. अशा परिस्थिती नोकरी शोधण्याच्या नादात तरुणांची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. अनेक वेळा बेरोजगार असल्याने आपल्याला फोनवर किंवा  SMS च्या माध्यमातून नोकरीसाठी विचारले जाते. अशावेळी  नोकरीची सत्यता न पडताळता आपण अर्ज करतो ,त्याची जराही कल्पना आपल्याला येत नाही. अशा खोटया नोकरीच्या बातम्यांपासून सावध राहणे खूप गरजेचेचे आहे.अशा वेळी नोकरीची सत्यता पडताळताना  दिलेल्या टिप्स पहा .

नोकरी शोधताना होऊ शकते फसवणूक त्यासाठी पहा काही महत्तवपूर्ण  टिप्स –

१) अनेकवेळा तरुणांना मोबाईलवर फोन किंवा sms च्या माध्यमातून नोकरीसाठी विचारलं जातं ,यासाठी पहिले तुम्हाला काही रक्कम भरावी लागते आणि नंतर ती रक्कम रिफंड होईल असे आश्वासन दिले जाते. अशापासून सावध रहा.

२) नोकरिची ऑफर देताना काहीवेळा तुमची वैयक्तिक माहिती विचारली जाते.त्यात बँकेचे डिटेल्स  क्रेडिटकार्ड OTP,आधार नंबर पॅन नंबर या संबधंतीत माहिती विचारली जाते.

३) फसव्या जाहिराती करताना त्यामध्ये चुका असतात.इंग्रजी जाहिरातीमध्ये व्याकरणाच्या चुकाही असतात .

४) तुम्हाला मुलाखतीच्या वेळी काही वेळा ऑफर लेटर दिलं जात तर काही वेळा मुलाखत न घेताच पैसे भर आणि ऑफर लेटर घ्या .अशी फसवणूक होऊ शकते .

५) काही ऑनलाईन  पोर्टलवर नोकरीसाठी अर्ज मागवले जातात ,त्यावेळी त्या पोर्टलची खात्री करून घेणे महत्वाचे आहे.

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”