सीए फाउंडेशन पेपर १ ची आजची परीक्षा लांबणीवर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्टस् ऑफ इंडिया (ICAI) ने फाउंडेशन पेपर – १ परीक्षा लांबणीवर टाकली आहे. ही परीक्षा मंगळवारी ८ डिसेंबर रोजी होणार होती. ८ डिसेंबर रोजी होणाऱ्या देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा आता १३ डिसेंबर रोजी होणार आहे. अन्य विषयांच्या परीक्षांच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

यासंदर्भात आयसीएआयने निवेदन जारी केले आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की, ‘काही अपरिहार्य कारणांमुळे चार्टर्ड अकाउंटन्टस् फाउंडेशन पेपर – १, प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिस ऑफ अकाउंटिंग या विषयाची परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. ही परीक्षा ८ डिसेंबर २०२० रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार होती.’

फाउंडेशन पेपर १ या विषयाची परीक्षा आता रविवारी १३ डिसेंबर २०२० रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे. उमेदवारांना जी प्रवेशपत्रं दिलेली आहेत तीच १३ तारखेला वैध असणार आहेत. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी आयसीएआयच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

अधिकृत वेबसाईट –  http://www.icai.org/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com