अर्थसंकल्प 2020 : नॉन-गॅजेटेड पदांवर भरतीसाठी एकच परीक्षा घेण्याचा प्रस्ताव

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्याचा  दुसरा अर्थसंकल्प जाहीर केला.निर्मला सीतारमण यांनी शिक्षण क्षेत्रांतील अनेक तरतुदी स्पष्ट केल्या.नॉन-गजेटेड पदांच्या भरती प्रक्रियेत सरकार मोठे बद्दल करण्याचं स्पष्ट करण्यात आले आहे. नॉन-गजेटेड पदांच्या भरतीसाठी राष्ट्रीय भरती एजन्सी स्थापन केली जाईल.हा प्रस्ताव मंजूर झाल्यास नॉन-गजेटेड पदांवर भरतीसाठी एकच परीक्षा घेतली जाईल.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नॉन-गजेटेड पदावर भरतीसाठी विशेष सर्वसाधारण चाचणी म्हणून राष्ट्रीय भरती एजन्सी स्थापना करण्याचा प्रस्ताव दिला आहे.नवीन प्रस्तावाप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र सुरु केले जाईल.विशेषतः महत्तवाकांक्षी जिल्ह्यामध्ये ही परीक्षा केंद्रे सुरु केली जातील.

नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”