Gk update । युनेस्कोने (संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था) बेल्जियम कार्निवलला मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीतून काढले आहे. सन 2019 च्या ‘कार्निव्हल ऑफ अॅलस्ट’ या कार्निवलमध्ये परेड फ्लोट दाखविण्यात आले होते, ज्यात ऑर्थोडॉक्स यहुद्यांची थट्टा करणारे वंशविद्वेषी आणि सेमेटिक विरोधी प्रतिनिधित्त्व होते.
एक अभूतपूर्व पाऊल म्हणून, अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी युनेस्कोच्या आंतरशासकीय समितीने सांगितले की, कार्यक्रमात “जातीयवादी आणि वंशविरोधी प्रतिनिधित्वांच्या सादरीकरणाच्या पुनरावृत्तीबद्दल” कार्निवल मागे घेण्यात येत आहे.
2010 मध्ये अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये कार्निवल जोडले गेले. अॅलस्ट कार्निवलला युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन (युनेस्को) यांनी मान्यता दिली होती, परंतु ज्यू संघटनांनी त्यांचा मोठ्या प्रमाणात निषेध केला आहे.
———————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-