करिअरनामा ।महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला उद्यापासून (3 मार्च) सुरुवात होणार आहे. राज्यभरात 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
यंदा राज्यभरातील 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. यामध्ये 9 लाख 75 हजार 894 मुलं आणि 7 लाख 89 हजार 898 मुली आहेत. या परीक्षेदरम्यान कॉपीचे प्रकार होता कामा नये, यासाठी “गैर मार्गाशी लढा” या उपक्रमाअंतर्गत, 273 भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये नाशिक येथे 80 केंद्र संवेदनशील असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, गतवर्षाच्या तुलनेत यंदा 65 हजार विद्यार्थ्यांमध्ये वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”