खुशखबर! आरोग्य विभागात 3160 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध, राजेश टोपेंची माहिती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

मुंबई । राज्यातील सार्वजिनक आरोग्य विभागात पदभरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागात मेगाभरती करण्यात येणार असून 8500 जागांसाठी आता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही जाहिरात रिक्त असलेल्या एकूण 17 हजार पदांपैकी 50 टक्के पदांसाठी असणार आहे. आरोग्य विभागाच्या संकेत स्थळावर याबाबतची अधिक माहिती देण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिली आहे. Arogya Vibhag Bharti

राज्य सरकारने जाहिरात प्रसिद्ध करुन अनेक विद्यार्थ्यांना दिलासा दिल्याचं म्हटलं जात आहे. जाहिरातीसाठी पुढच्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येतील अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. 28 फेब्रुवारी 2021रोजी एकाच दिवशी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. फेब्रुवारी 2019 साली जे उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरले होते ते उमेदवार आता या नव्या जाहिरातीसाठीही पात्र ठरतील. या परीक्षेसाठी फेब्रुवारी 2019 मध्ये महापोर्टलच्या माध्यमातून अर्ज मागवले होते. त्यामुळे आता जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्या उमेदवारांना पुन्हा नव्याने अर्ज करायची गरज नसल्याचं सांगण्यात येत आहे. Arogya Vibhag Bharti

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या भरतीला चालना मिळण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली होती. पुढील काही महिन्यात साधारण आठ हजार पेक्षा जास्त नोकर भरती आरोग्य आणि ग्रामविकास विभागात केली जाणार आहे. कोरोना संकटामुळे आरोग्य क्षेत्रात आवश्यक भरती केली जाणार आहे. पुढील दोन महिन्यात नोकरभरती प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचंही राजेश टोपेंनी सांगितलं होतं.

फेब्रुवारीमध्ये एकाच दिवशी परीक्षा
सदर प्रसिध्द झालेल्या जाहिरातीसाठी फेब्रुवारी मध्ये एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येणार आहे. 28 फेब्रुवारी 2021 रोजी एकाच दिवशी ही परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती विभागाने दिली आहे. एसईबीसी उमेदवार हे आर्थिक दुर्बल प्रवर्गाचा लाभ घेऊ शकतात असे सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. Arogya Vibhag Bharti

रिक्त पदे : 3160 पदे (अंदाजे).

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र.

अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन.

पदांची नावे : सामाजिक अधीक्षक (भौतिकशास्त्र), फिजिओथेरपिस्ट, समुपदेशक, व्यावसायिक थेरपिस्ट, ज्युनियर लिपिक, सामाजिक अधीक्षक (वैद्यकीय), प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, नेत्र चिकित्सा अधिकारी, नॉन वैद्यकीय सहाय्यक, सांख्यिकीय अन्वेषक, रासायनिक सहाय्यक, बॅक्टेरियोलॉजिकल असिस्टंट, ज्युनियर अभियंता, मीडिया मेकर, टेलिफोन ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, कुशल कारागीर, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, जेआर तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ, फोरमॅन, सेवा अभियंता, वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक, शिक्षक, सार्वजनिक आरोग्य परिचारिका, बालरोग परिचारिका, ग्रुहा वस्त्रपाल, लॅब टेक अधिकारी, लॅब वैज्ञानिक अधिकारी, लॅब सहाय्यक, एक्स -रे टेक्निशियन. ब्लड बँक वैज्ञानिक अधिकारी, फार्मासिस्ट अधिकारी, डाएटिशियन, स्टाफ नर्स, ड्रायव्हर, प्लंबर, अभिलेखपाल, ज्युनियर क्लर्क, इलेक्ट्रीशियन, एएनएम, सीनियर क्लार्क, लॅब टेक्निशियन, एक्स-रे तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, फार्मसी अधिकारी, ईसीजी टेक्निशियन, टेलर , रेकॉर्ड कीपर, हाऊस अँड लिनेन कीपर, स्टोअर व लिनन कीपर, एक्स-रे वैज्ञानिक अधिकारी, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, डायलिसिस टेक्निशियन, शिंपी, नलकरगिरी, सुतार, डेंटल हायजीनिस्ट, वॉर्डन, अबलेखापाल, सुतार, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, टेलर, ईसीजी तंत्रज्ञ .

 अधिकृत वेबसाईट : https://arogya.maharashtra.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com