फेब्रुवारीत होणार सैन्य भरती मेळावा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । सैन्‍य भरती मुख्‍यालय, पुणे यांच्‍या संयुक्त विद्यमाने फेब्रुवारीमध्ये 4 ते 13 तारखेला पुणे, बीड, अहमदनगर, लातूर आणि उस्‍मानाबाद या ५ जिल्‍हयातील उमदेवारांसाठी सैन्‍य भरती मेळावा आयोजित करण्‍यात आला आहे. हा मेळावा बीड येथील सैनिक विद्यालयामध्‍ये आयोजित केला आहे.

यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या संकेत स्‍थळावर ऑनलाईन नाव नोंदणी करणे आवश्‍यक आहे. सैन्‍य भरती मेळाव्‍यात सोल्‍जर जी डी, सोल्‍जर ट्रेडसमॅन व सोल्‍जर टेक्‍नीकल या पदासाठी भरती होणार आहे. तसेच अधिक माहितीसाठी [email protected] या संकेत स्‍थळावर किंवा दूरध्‍वनी क्रमांक 020- 26345005 वर संपर्क साधावा.

अहमदनगर जिल्‍हयातील पात्र उमेदवारांनी संकेत स्‍थळावर ऑनलाईन नोंदणी करुन सैन्‍य भरती मेळाव्‍यात सहभागी व्‍हावे असे आवाहन जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी अहमदनगर यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये केले आहे.

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]