करिअरनामा । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात मानसिक दृष्ट्या मदत करण्यासाठी दहा समुपदेशकांची नियुक्ती केली आहे.सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत समुपदेशकांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेच्या भीतीमुळे दडपण येते. त्यामुळे अनेक विद्यार्थी नकारात्मक विचार करू लागतात. अशा परिस्थितीत मानसिक ताण कमी करण्यासाठी समुपदेशकांची गरज असते. त्यामुळे बारावी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून राज्य शिक्षण मंडळाने समुपदेशकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे .
समुपदेशकांशी संपर्क –
1) 8421741931
2) 7249005260
3) 9619248229
4) 9356056300
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”