शिक्षक भरतीची सर्व प्रक्रिया मार्च अखेर होणार पूर्ण

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । राज्य शासनाच्यावतीने पवित्र पोर्टलद्वारे राबविण्यात येत असलेली शिक्षक भरतीची सर्व प्रक्रिया मार्च अखेर पूर्ण करण्यात येणार आहे.

इयत्ता नववी ते बारावी या गटातील खासगी संस्थांमधील 800 पदे रिक्त होती. आता पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी उमेदवारांकडून प्राधान्यक्रम नोंदवण्याची प्रक्रिया गेल्या महिन्यात पूर्ण करण्यात आलेली आहे. यातील उमेदवारांची निवड यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर मार्चमध्ये माजी सैनिकांच्या 1 हजार 200 पदे भरण्याची प्रक्रियाही पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे.

खासगी संस्थांमधील 3 हजार शिक्षकांची पदे भरण्यासाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहे.तसेच एका जागेसाठी दहा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवावे लागणार आहे. गुणवत्तेनुसारच उमेदवाराची निवड करण्याचे बंधनही घालण्यात आलेले आहे.

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”