करिअरनामा ऑनलाईन । आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना युवक क्रांती दलाने ‘ शिक्षण पालकत्व’ या उपक्रमाद्वारे मदतीचा हात दिला आहे. एकल पालक असलेल्या दहा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करण्यात आली असून, येत्या काळात आणखी काही विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पर्यंत करण्यात येणार आहे.
युवक क्रांती दलातर्फे एप्रिलपासून गरजूना किराणा साहित्याचे वाटप करताना अनेकांनी त्यांचे अन्य प्रश्नही सांगितले, त्यात काहींनी मुलांचा शिक्षणाचा प्रश्न असल्याचे नमूद केले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु राहण्यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या सहकार्याने ‘ शिक्षण पालकत्व’हा उपक्रम सुरु केला आहे.
ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक साहित्य , शाळा शुल्क , वर्षभराच्या खर्चाचे पालकत्व काहींनी घेतले त्यात माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले ,जेष्ठ लेखिका डॉ.सिसिलिया आदींचा समावेश आहे, असे युक्रांदचे कार्यवाह संदीप बर्वे यांनी सांगितले. शाळेचे थेट शुल्क भरणे ,शैक्षणिक साहित्य देणे अशा पद्धतीने शालेय शिक्षण पालकत्व घेता येऊ शकते.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com